You are currently viewing दिवा ते रत्नागिरी, सावंतवाडी गाड्या सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबरपर्यंत धावणार

दिवा ते रत्नागिरी, सावंतवाडी गाड्या सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबरपर्यंत धावणार

मुंबई :

गणेशोत्सव काळात कोकणात  जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी  दिवा ते रत्नागिरी, दिवा ते सावंतवाडी  गाड्या सुरू केल्या होत्या.

या गाड्या 30 सप्टेंबरपर्यंत धावणार होत्या. तर, आता या 31 ऑक्टोबरपर्यंत चालविण्यात येणार असल्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकणात येजा करणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांचा लाभ होणार आहे.

गाडी क्रमांक 01503/01504 दिवा-रत्नागिरी दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस 30 सप्टेंबरऐवजी 31 ऑक्टोबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक दिवा-सावंतवाडी रोज दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस विशेष गाडी 1 ऑक्टोबरऎवजी 31 ऑक्टोबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक 01506 सावंतवाडी रोड ते दिवा दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस 30 सप्टेंबरऐवजी 31 ऑक्टोबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक 01501 रत्नागिरी ते मडगाव दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस 1 ऑक्टोबरऐवजी 31 ऑक्टोबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक 01507 सावंतवाडी रोड ते मडगाव दैनंदिन आरक्षित विशेष गाडी 1 ऑक्टोबरऐवजी 31 ऑक्टोबरपर्यंत धावेल.

दिवाळी, नववर्षानिमित्त मुंबई ते मडगाव विशेष गाड्यांची मुदतवाढ

गाडी क्रमांक 01111 मुंबई ते मडगाव विशेष दैनिक उत्सव ट्रेन 1 नोव्हेंबर ते 30 जानेवारीपर्यंत दररोज चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01112 विशेष मडगाव-मुंबई दैनिक उत्सव ट्रेन 1 नोव्हेंबर ते 30 जानेवारीपर्यंत दररोज चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01113 मुंबई-मडगाव विशेष दैनिक उत्सव ट्रेन 2 नोव्हेंबर ते 30 जानेवारीपर्यंत दररोज चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01114 मडगाव-मुंबई विशेष दैनिक उत्सव ट्रेन 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत दररोज चालविण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे दिवाळी, नववर्षानिमित्त प्रवास करणाऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =