You are currently viewing अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पथक अधिकाऱ्यावर हल्ला…

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पथक अधिकाऱ्यावर हल्ला…

मुंबई :

 

भाईंदर मध्ये एका फेरीवाल्याने चक्क लोखंडी रॉड ने पालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून भाईंदर पश्विम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाईंदर पश्चिम येथील बॉम्बे मार्केट रस्त्यावर  मोठ्या संख्येने फेरीवाले बसत असल्याने रविवारी संध्याकाळी फेरीवाले पथक त्या ठिकाणी दाखल झाले.

त्या ठिकाणी उपस्थितीत फेरीवाले संतप्त झाले. आणि चक्क एका फेरीवाल्याने कारवाईचा विरोध करत फेरीवाले पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉड ने हल्ला केला.

यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा दल कर्मचारी उपस्थितीत होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा विडिओ समाज माध्यमामावर वायरल झाला आहे.

या संदर्भात तक्रारदार पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुट पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा