You are currently viewing गोगटे महाविद्यालयाच्या १९७४ च्या बी ए बॅच चा सिंधुदुर्गात स्नेहमेळावा

गोगटे महाविद्यालयाच्या १९७४ च्या बी ए बॅच चा सिंधुदुर्गात स्नेहमेळावा

सावंतवाडी

रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयाच्या १९७४ च्या बीएच्या बॅचचा सहावा स्नेहमेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शिल्पग्राम रिसॉर्ट मध्ये नुकताच उत्साहाने पार पडला. विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी बजावून निवृत्त झालेल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी सुसंवाद साधला.कणकवली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. राजेंद्र सावंत सर,मुंबई माजगाव डॉक मधून अधिक्षक म्हणून निवृत्त झालेले श्री. राजन खानविलकर मुंबई महानगरपालिका मधील निवृत्त ज्येष्ठ पर्यवेक्षक माया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेली सात-आठ वर्षे ऋणानुबंध परिवार तर्फे दरवर्षी स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात येतो.

यापूर्वी गणपतीपुळे , रत्नागिरी, बडोदा गुजरात येथे स्नेहमेळावे झाले. आपल्या गुरुजनाचे ऋण व्यक्त करून यांचे स्मरण आणि आपल्या तील मैत्री, सद्भावना ,सर्व धर्म समभाव, वाढून परस्परांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ही संमेलने आदर्श ठरली आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे या स्नेहमेळाव्याचे नियोजन ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांनी शिल्पग्राम येथे केले होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा पूर्वीचा अविभक्त जिल्हा असल्याने अनेकांची रेशीमगाठ, मैत्री ला उजाळा मिळाला. परिवारातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून त्यांचे स्मरण करण्यात आले.

कोरोना साथीमध्ये आपल्याला सोडून गेलेल्या सहकारी कुटुंबीयांना पावणेदोन लाखाची आर्थिक मदत परिवाराने केली तसेच अनेक सदस्याच्या समस्यांवर तर काही संकटे कोसळली त्यांच्या परिवाराला त्याच्या मदतीसाठी ऋणानुबंध परिवार नेहमी धावून गेला आणि त्यांना जगण्याची उमेद दिली. या घटनाना उजाळा देण्यात आला. परिवारातील एक जेष्ठ सदस्य शरद नातू यांनी पंच्याहत्तरी पूर्ण केल्याबद्दल नातू दाम्पत्याचा तसेच सौ. सुचिता उपळेकर या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मनोरंजन कार्यक्रमात अनुया पेडणेकर, शैला खानोलकर ,माया शिंदे यांचे डान्स. नीला जोशी, गौरी मलुष्टे ,भालचंद्र करंदीकर सौ.सुर्वे यांचे गीत गायन तर श्री बाळू सरदेसाई यांची कन्या रेणुका सरदेसाई इथे हिचे श्री गणेश वंदना करणारे कथक नृत्य यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्वश्री रमेश सुर्वे ,श्री अनिल उपळेकर , श्री .विश्वनाथ शिर्के. विजय कदम सोनाली खानोलकर. यांनीही आपल्या मनोगतात ऋणानुबंध परिवाराचे कौतुक केले.ऋणानुबंध परिवाराचा मेळाव्यात सिंधुदुर्ग पर्यटन दर्शन हा एक महत्त्वाचा भाग होता.

त्यानुसार रेडीचा स्वयंभू गणेश, वेंगुर्ला बंदर, शिरोडा वेळागर बीच ,आंबोली धबधबा. हिरण्यकेशी मंदिर. कावळेसाद पॉइंट आदि पर्यटन स्थळाना भेटी देऊन ऋणानुबंध परिवाराचा हा मेळावा यशस्वी केला. समारोपा मध्ये सर्व सदस्यांना गजानन नाईक यांनी सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध लाकडी फळांचे भेट देत सर्वांचे आभार मानले. ऋणानुबंध परिवारातर्फे गजानन नाईक यांच्या परिवाराचा तसेच शिल्पग्राम मधील आदरातिथ्य बद्दल शिल्पग्राम व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन गजानन नाईक आणि राजन खानविलकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =