You are currently viewing संविधान ही डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेली मोठी देणगी – सिद्धीश्री माणगावकर

संविधान ही डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेली मोठी देणगी – सिद्धीश्री माणगावकर

मालवण

संविधान ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजविणे हा संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. त्यामुळे सध्याच्या तरुण पिढीने संविधान जाणून घ्यायला हवे असे प्रतिपादन मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्राच्या व्यवस्थापिका सिद्धीश्री माणगावकर यांनी  केले.

येथील मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्राचे उदघाटन व संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास क्षेत्र समन्वयक विश्वजित जाधव, अक्षय मोडक, सहयोग बौद्धविकास मंडळ चौकेचे अध्यक्ष दुलाजी चौकेकर, सुभाष चौकेकर, कृष्णा चौकेकर अन्य नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा