You are currently viewing मिलाग्रीस मराठी माध्यम १९८९ बॅच तर्फे पार पडला सावंतवाडी कार्यकारी अभियंता श्रीम.अनामिका जाधव-चव्हाण यांचे अभिनंदन व सत्कार सोहळा

मिलाग्रीस मराठी माध्यम १९८९ बॅच तर्फे पार पडला सावंतवाडी कार्यकारी अभियंता श्रीम.अनामिका जाधव-चव्हाण यांचे अभिनंदन व सत्कार सोहळा

सावंतवाडी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर बढती मिळालेल्या श्रीम.अनामिका जाधव-चव्हाण यांचा सत्कार आज त्यांच्याच मिलाग्रीस मराठी माध्यमाच्या १९८९ बॅचच्या शाळा सोबतींकडून करण्यात आला. श्रीम.अनामिका जाधव यांच्या सत्काराच्या निमित्ताने मिलाग्रीस मराठी माध्यमाचे छोटेखानी स्नेहसंमेलन देखील पार पडले. शाळेच्या ग्रुप वर केलेल्या एका व्हाट्सअप्प मेसेजवर अल्पावधीतच ठरलेल्या कार्यक्रमासाठी तब्बल २० ते २५ जणांची उपस्थिती होती हे विशेष.


मिलाग्रीस मराठी मध्यम बॅच १९८९ तर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन श्रीम.अनामिका जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले. सावंतवाडी नगराध्यक्ष, व १९८९ बॅचचे सदस्य सच्चिदानंद परब यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सावंतवाडी नगराध्यक्ष सच्चिदानंद परब यांनी स्वागतपर भाषण करत अनामिका जाधव यांचे अभिनंदन केले व अशाचप्रकारे प्रत्येकवर्षी ग्रुप च्या सर्व सदस्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. ग्रुप चे सदस्य दीपक पटेकर यांनी मैत्री या विषयावर काव्य वाचन करून कार्यक्रमात रंगत आणली. सातार्डा माजी सरपंच व ग्रुप चे सदस्य उदय परिपत्ये यांनी अभिनंदनपर भाषण करत श्रीम.अनामिका आपली मैत्रीण असल्याचा अभिमान असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. नागेश बिद्रे, डॉ.समीर सडेकर आदींनी मनोगत व्यक्त करत अनामिका हिला शुभेच्छा दिल्या.
आभारप्रदर्शन कार्यक्रमात श्रीम.अनामिका जाधव-चव्हाण यांनी एका हाकेवर जमलेल्या सर्व मित्र-मंडळींचे आभार मानून मैत्रीप्रतिच्या भावना व कामातील अनुभव कथन करून आपल्या जिल्ह्यात, आपल्या लोकांमध्ये काम करताना आनंदच मिळत असल्याचे सांगून आपल्या मैत्रीवरील आणि कामावरील प्रेम दाखवून दिले. स्नेहमेळावा आणि स्नेहभोजनासह रात्री कार्यक्रमाची सांगता झाली.
श्रीम.अनामिका जाधव यांच्यावरील प्रेमापोटी मिलाग्रीस मराठी माध्यम बॅच १९८९ चे मित्र दीपक पटेकर, नगराध्यक्ष सच्चिदानंद परब, प्रशांत कासकर, संदीप कांदे, सुजित निखार्गे, आबा बोन्द्रे, सुनील भुसांनावर, विठ्ठल(विनोद) सावंत, तुकाराम(तुषार) सावंत, गोवा येथून डॉ समीर सडेकर, प्रशांत आरोलकर, नागेश बिद्रे, अनिल नाईक, विनायक बागायतकर, उदय परिपत्ये, शेखर जाधव, अभिजित भंडारे, प्रसाद सावंत तसेच मैत्रिणी मालवण येथून वहिदा शेख, संगीता गवस, सुनेत्रा नाईक, वेदवती वाडीकर, मेरी डीसोजा, इत्यादींसह आदित्य जाधव आदी उपस्थित होते. दरवर्षी नव्हे तर अधून मधून वेळ काढून भेटत राहू या आशेवर कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 7 =