You are currently viewing हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

वित्त आणि बांधकाम सभापतींच्या हस्ते शुभारंभ : ८.५० लाखांचा निधी मंजूर

मालवण :

संविधान दिनाचे औचित्य साधून हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला.

गेली अनेक वर्षे हिवाळे धनगरवाडी ग्रामस्थांची शाळा दुरुस्तीची मागणी होती. माजी सरपंच विश्वास परब यांनी वित्त सभापती यांचे याठिकाणी लक्ष वेधल्यानंतर श्री. चव्हाण यांनी यासाठी ८.५० लाखाचा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. या कामाचे भूमिपूजन महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच रघुनाथ धूरी, विश्वास परब, बबन परब, दिनेश परब, भाई पवार, रामचंद्र जंगले, भगवान जंगले, धाकू शेळके, नयन शेळके, बाळू जंगले, ललित जंगले, कुणाल जंगले, शिक्षीका राऊळ मॅडम, गोसावी मॅडम आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा