You are currently viewing संवाद मिडिया – दिवाळी विशेषांक 2021 – अभिप्राय

संवाद मिडिया – दिवाळी विशेषांक 2021 – अभिप्राय

 

संवाद मिडिया दिवाळी अंकात माझ्या पारितोषिक या कथेला स्थान दिल्याबद्दल संपादक मंडळाचे मनःपूर्वक धन्यवाद!!
कालच हा अंक हाती मिळाला. सुंदर मुखपृष्ठ श्री दिपक पटेकर यांची बहिण कु. अपर्णा जाधव हिने सुंदर डिझायन केले आहे. खरंतर ही कोल्हापूर येथे कलानिकेतन काॅलेजची विद्यार्थी पण मंडळाने तिच्यावर विश्वास टाकला आणि एक छान कलाकृती निर्माण झाली. सुंदर सुबक छपाई हे या अंकाचे खास विशेष. संपादकीय मनोगत श्री राजेश नाईक यांनी लिहिलंय. अंकातील सर्वच लेखनाचा सखोल अभ्यास करून लिहिलंय. हे वाचताच अंक वाचल्याशिवाय रहावे नाही. पुर्ण अंकाचा लेखाजोखा यामध्ये समाविष्ट आहे. हे वाचत असताना अंतरंगामध्ये बरीच ओळखीची भेटली त्याचा विशेष आनंद झाला. विजयाताई शिंदे, अचला मॅडम, भारतीताई रायबागकर यांचे सुंदर लेख यामध्ये समाविष्ट आहेत. अंकातील प्रत्येक लेख वाचनीय आहे. सर्वसमावेशक विषयावरील लेखन आनंद देऊन जाते.
आपणही याचा आनंद घ्यावा. अंक मिळण्यासाठी दीपक पटेकर यांना संपर्क करावा.

*दीपक पटेकर*
*8446743196*

✒️श्रीकांत दीक्षित, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा