You are currently viewing दुःख

दुःख

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण यांची अप्रतिम काव्यरचना

वेदना विसरून दुःख लपविते मी,
भावना सावरून दुःख लपविते मी…।

मनात विखुरलेले काटे वेचूनिया
तयांना आवरून दुःख लपविते मी…।

वाटेत चालताना ठेचाळले तरीही,
जखमेस विसरून दुःख लपविते मी…।

काल नव्हते आज उद्या हि पण नाही,
असे समजून दुःख लपविते मी…।

दुःख म्हणजे जीवनाचे अंग असते,
दुःखास त्या स्मरून दुःख लपविते मी…।

 

✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*

प्रतिक्रिया व्यक्त करा