You are currently viewing २६/११ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना वाहण्यात आली आदरांजली…

२६/११ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना वाहण्यात आली आदरांजली…

वैभववाडी

वैभववाडी येथे आज दि. २६ नोव्हेंबर रोजी २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले वैभववाडी तालुक्यातील एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना स्थानिक ग्रामस्थ व अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण केला. ‘अमर रहे..! अमर रहे..! विजय साळसकर अमर रहे..!’ या घोषणेने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी सारा परिसर दणाणून सोडला.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, उपसरपंच रविंद्र रावराणे, सुनिल रावराणे, गोविंद रावराणे, ग्रामसेवक राठोड, पोलिस पाटील राजेंद्र रावराणे, एडगाव ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा