You are currently viewing पंजाबचा दहशतवादी नांदेडमध्ये गजाआड, पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

पंजाबचा दहशतवादी नांदेडमध्ये गजाआड, पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

पंजाबचा दहशतवादी नांदेडमध्ये गजाआड, पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

पंजाब येथील अमृतसर मध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका सदस्याला नांदेड येथून अटक करण्यात आली आहे.

 

नांदेड : पंजाब येथील अमृतसरमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका सदस्याला नांदेड येथून अटक करण्यात आली. पंजाब पोलीस आणि नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत त्याला त्याब्यात घेतले.

 

गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी असे त्याचे नाव असून पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा मुक्तसर येथील तो रहिवाशी आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार जणांविरुद्ध बंदीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी एकजण नांदेड येथे असल्याची गुप्त माहिती पंजाब राज्य पोलीस दलाला मिळाली होती. त्या अनुषंगाने पंजाब पोलीस नांदेड येथे आले होते. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने नांदेड तहसील कार्यालयांच्या परिसरात आरोपीला 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.05 वाजता ताब्यात घेतले.

या घटने विषयी अधिक माहिती घेण्यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना संपर्क साधला असता ही कार्यवाही पंजाब पोलिसांनी केली असून आम्हाला या विषयी काहीही बोलता येणार नाही असे ते म्हणाले. तसेच सदर घटना ही सेन्सेटीव्ह असल्या कारणाने त्या विषयी मी बोलणे उचित ठरणार आहे असे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सदर घटनेतील आरोपीस नांदेड न्यायालयासमोर हजर करून प्रवासी रिमांडवर त्यास पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =