You are currently viewing सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली, शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद !

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली, शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद !

सावंतवाडी

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, आंबोली प्रशालेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला धावपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वयोगटातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. सावंतवाडी येथील प्रसिद्ध जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. मॅरेथॉन स्पर्धेस ब्रिगेडीअर सुधीर सावंत, ५८ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिपक दयाल यांचे प्रतिनिधी अॅडम ऑफिसर सुभेदार मेजर आर. एन. भांजा व बी. एच. एम. सुरजितसिंग, सावंतवाडी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके, सैनिक स्कूलचे सेक्रेटरी श्री. सुनिल राऊळ, सैनिक स्कूलचे संचालक श्री. जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, प्राचार्य श्री. एस. टी. गावडे, सिंधुदुर्ग आय. इ. एस. एल. चे अध्यक्ष श्री. शशिकांत गावडे, कार्याध्यक्ष कॅप्टन सुभाष सावंत, तालुका अध्यक्ष श्री. दिपक शेट्ये, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन श्री. शिवराम जोशी, संचालक श्री चंद्रकांत शिरसाट, बाबुराव कविटकर, सैनिक पतसंस्थेचे उपमहाव्यवस्थापक श्री. प्रल्हाद तावडे, क्रिडाशिक्षक श्री. शैलेश नाईक, सैनिक स्कूल व सैनिक पतसंस्था चे कर्मचारी उपस्थित होते.

शहिद जवानांना समर्पित असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रगीत गायन व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलित करुन करण्यात आले. सैनिक स्कूलचा कॅडेट सन्मेश पाटिल याने शहिद जवानांच्या बलिदानावर कविता करून शहिदांना मानवंदना दिली. प्रास्ताविक करताना श्री. सुनिल राऊळ यांनी मॅरेथॉन स्पर्धा सैनिक स्कूलच्या वर्धापन दिनानिमित्त शहिद जवानांच्या अत्युच्च बलिदानास समर्पित करण्यासाठी आयोजित केल्याचे सांगितले. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सैन्य सेवेत मनोबल महत्वाचे असते असे सांगितले. स्पर्धकांना सुद्धा जिद्द व उच्च मनोबल ठेवून विजय संपादन करावा असे आवाहन केले.

क्रिडा शिक्षक श्री. शैलेश नाईक व मनोज देसाई यांनी स्पर्धेचे नियम स्पर्धकांना समजावून सांगितले. सदर मॅरेथॉन स्पर्धा खुला गट, १७ वर्षांखालील १४ वर्षाखालील मुले व मुली अशा एकूण ५ गटांत घेण्यात आली. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत लहान मुलांपासून ते वयस्कर एकूण ५९७ धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला.

प्रमुख अतिथींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुली या वयोगटांत कु. पूजा तुकाराम सावंत प्रथम क्रमांक, कु. आर्या आप्पा कापाडी व्दितीय क्रमांक, कु, आस्था अमित लिंगवत तृतीय १४ वर्षांखालील मुले वयोगटात कु. पार्थ प्रशांत डकारे – प्रथम कु. सुयश बाळकृष्ण पेटेकुळकर-व्दितीय तृतीय श्वेत एकनाथ धरणे १७ वर्षाखालील मुले गटांत कु. स्वराज जोशी प्रथम, कु. हर्षल कदम व्दितीय क्रमांक कु. श्रेयश ओकटे तृतीय. खुला गट पुरुष विवेक नारायण मोरे प्रथम, प्रमोद दशरथ गावडे व्दितीय, फ्रॅन्की तमास गोम्स तृतीय, खुला गट महिला रोहिणी लक्ष्मण पाटिल प्रथम, सोनल संतोष येंडे व भक्ती सुनिल पोटे द्वितीय, सतिषा कृष्णा वेर्णेकर व रसिका बाळकृष्ण परब तृतीय

विजेत्या स्पर्धकांना ब्रिगेडिअर सुधीर सावंत, अॅडम ऑफिसर सुभेदार मेजर आर. एन. भांजा व बी. एच. एम. सुरजितसिंग, सैनिक स्कूलचे सेक्रेटरी श्री. सुनिल राऊळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच सहभागी धावपटूंनी प्रमाणपत्र मिळाले नसल्यास संस्थेच्या कार्यालयातून घेवून जाण्याचे आवाहन स्पर्धकांना करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 5 =