You are currently viewing बांदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जत्रोत्सवात जुगाराला हिरवा बावटा

बांदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जत्रोत्सवात जुगाराला हिरवा बावटा

बांदा :

 

जत्रोत्सव आणि जुगार यांचं पूर्वीपासून घट्ट नातं. जत्रोत्सवात जत्रेला भाविक म्हणून जाणारा जेवढा भक्तपरिवार असतो तसाच मौजमजेसाठी आणि व्यवसाय म्हणून जुगाराला जाणारा देखील दुसरा हौशी वर्ग असतो. गेली काही वर्षे जत्रोत्सवात जुगाराला बंदी आली आणि बरेच जत्रोत्सव गर्दी विनाच आटोपू लागले. जुगार असतानाची तेजी जत्रोत्सवात खरेदीत देखील दिसून येत नाही. सावंतवाडी तालुक्यातील बांदा पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये जत्रोत्सवात जुगारांच्या बैठकांना हिरवा सिग्नल मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जत्रोत्सवात गर्दी आणि पैशांची उधळण होणार अशी खात्री वाटू लागली आहे.

काल रात्री कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील जत्रोत्सवात जुगाराच्या बैठका लागल्या होत्या. जत्रोत्सवात जुगाराच्या प्रत्येक बैठकीसाठी ५०००/- प्रति बैठक (पाल) स्थानिक खाकी वर्दीला हफ्ता या अटीवर जुगार जोरदार सुरू होता. जत्रोत्सवात सुरू असलेल्या जुगाराची टीप एलसीबी ला मिळताच एलसीबी ने छापा टाकला. त्यामुळे जुगाऱ्यांची धावाधाव झाली, देवदर्शनासाठी आलेल्या लोकांचीही त्यात पळापळ होऊन धावपळीत काही भाविकांना देखील दुखापती झाल्या.

जिल्ह्याची अवैध धंद्याच्या नावाने बदनामी होत असतानाच, खाकी वर्दी आपापल्या भागात जत्रोत्सवात जुगार सुरू करून कोरोनाच्या तडाख्यात होरपळलेल्या लोकांनाच जुगारात गाडून घेण्याची संधी उपलब्ध करून देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. जत्रोत्सवात जुगार बंदीच हवी अशी सर्वसामान्य ग्रामस्थांची भूमिका आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 19 =