कुडाळ :
बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ ही सिंधुदुर्ग जिल्हयातील पहीली सी.बी.एस. ई मान्यता प्राप्त शाळा सन 2009-10 पासून एम.आय.डी.सी. कुडाळ मध्ये सुरु आहे.
या शाळेला शैक्षणिक वर्ष 21 – 22 करीता केंद्रीय शिक्षण बोर्ड नवी दिल्ली यांचे कडून इयत्ता 10 वी व 12 वी साठी परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 25/11/2021 ते 30/12/2021 या कालावधीत इयत्ता 10 वी व 12 वी ची प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. या परीक्षेकरीता एकूण 29 विद्यार्थी- विद्यार्थीनी प्रविष्ठ झाले आहेत.
या परीक्षा केंद्रासाठी सेंटर सुपरिटेंडेंट म्हणून सौ. स्वरा स्वप्निल गावडे या काम पाहत आहेत. या तालुक्यातील विद्यार्थी -विद्यार्थिनींना यापूर्वी इतर ठिकाणी प्रवास करून परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे या वर्षी बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे परीक्षा केंद्र मंजूर झाले आहे. या शाळेला परीक्षा केंद्र मिळावे म्हणून केंद्रीय राज्य मंत्री मान. श्री. श्रीपाद नाईक यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच खासदार मान. विनायक राऊत यांनी तत्कालीन केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री मान.श्री. संजय धोत्रे यांना या शाळेला परीक्षा केंद्र मिळावे म्हणून शिफारस केली या सर्वांचे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले .
या परीक्षेसाठी विद्यार्थी- विद्यार्थीनीना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन मान. श्री उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर, शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य,प्राध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक समिती सदस्य या सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.