You are currently viewing काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी घेतली राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट…

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी घेतली राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट…

सिंधुदुर्गातील कणकवली तालुका येथे कासार्डे गावी सिलिका माफिया मार्फत सीलिका वाळूचे मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन चालू आहे.या संदर्भात फेब्रुवारी २०२१ मध्ये मी स्वतः मां .तहसीलदार साहेबाना निवेदन देऊन यातील अधिकृत खानी किती व अनधिकृत खाणी कीती हा प्रश्न विचारला होता.त्यानंतर तहसीलदार साहेबांनी धाडी टाकून बरेच ट्रक व वॉशिंग प्लांट यांना सिल लावले होते व दंड ही केला होता.परंतु थोडे दिवस जाताच पकडलेला माल अनधिकृत पणे पास नसताना पोलिस संरक्षणात कोल्हापूरला रवाना झाला आहे.अजूनही संध्याकाळी ६वाजल्यापासून ओव्हरलोड गाड्या फोंडा व वैभववाडी मार्गे सिलीका बिनदिक्कतपणे कोल्हापूरला जात आहेत.
अनधिकृतपणे काढलेल्या सिलिकाचे वॉशिंग प्लांट मध्ये येवून धुतली जाते व ती पियाली आणि इतर नदीमध्ये सोडली जाते.त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता आहे.
तरी आपण राज्याला मिळणारा महसूल हा सुमारे वरशाला २००कोटी कसा मिळवता येईल ते पाहावे असे निवेदन श्री.महिंद्र सावंत,सरचिटणीस,सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस यांनी माननीय कॅबिनेट महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री श्री.अब्दुल सत्तार साहेब यांना दिले आहे..,दोघांनीही येत्या८ दिवसात कलेक्टर ना आदेश देवून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा