You are currently viewing अखेर देवगड जामंसंड न.पं.निवडणुकीचे पडघम वाजले

अखेर देवगड जामंसंड न.पं.निवडणुकीचे पडघम वाजले

देवगड :
राज्यातील १०५ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून यामध्ये देवगड जामसंडे न.पं.चीही निवडणुक जाहीर झाल्याने निवडणुकीचा रणधुमाळीला सुरूवात झाली आहे.

राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे यामध्ये १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याने डिसेंबर महिना रणधुमाळींनी गाजणार आहे.
देवगड जामसंडे न.पं.चे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यात अचानकपणे राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणुक रिंगणात उतरण्यास सज्ज झालेल्या उमेदवारांची यादी बनवण्यात सर्वच पक्ष गुंग झाले आहे आहेत.देवगड जामसंडे न.पं.च्या १७ प्रभागांचे आरक्षणानुसार उमेदवार निश्चित करणे हे प्रमुख काम नेतेमंडळींचे असणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =