You are currently viewing कबड्डी खेळासाठी जिल्हास्तरीय खेलो इंडियाचे प्रशिक्षण केंद्र  

कबड्डी खेळासाठी जिल्हास्तरीय खेलो इंडियाचे प्रशिक्षण केंद्र  

सिंधुदुर्गनगरी

क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता  कबड्डी या खेळ प्रकाराचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

            खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रसाठी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आलेली होती या निवड चाचणीस खेळाडूंचा अल्प प्रतिसाद असल्याने पात्र खेळाडू प्राप्त न झाल्याने . पुनश्च दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ राजी सकाळी ९ वाजता खेला इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कबड्डी खेळाडुंची निवडचाचणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या निवड चाचणीस खेळाडूंसाठी वयोमर्यादा ८ ते १२ वर्षाखालील मुले, मुली ही आहे. खेळाडुंनी निवड चाचणीस येताना कबड्डी किट तसेच जन्म तारखेचा पुरावा आधारकार्ड, जन्मदाखला सोबत आणणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 12 =