भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना अमलात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. ही योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत धरतीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित सर्व धनगर बांधवांना सुचित करण्यात येते की, सदर योजना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपाची आहे. या योजनेबाबतचा अर्ज ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांचे मार्फत गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे आहे.
▪️लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या जमाती क या मूळ प्रवर्गातील असावा.
▪️ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रूपये पेक्षा कमी असावे.
▪️कुटुंबाचे स्वतःचे मालकीचे घर नसावे.
▪️कुटुंब हे भूमिहीन असावे. ▪️ लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
▪️त्याने राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
▪️सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल.
▪️ लाभार्थी वर्षभरात सहा महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.