You are currently viewing युवक राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्रचना करणार – युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक

युवक राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्रचना करणार – युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक

कार्यकारिणीच नसल्याने राजीनाम्यांचा प्रश्नच नाही

कुडाळ :

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी एक महिन्यापूर्वीच बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे युवक कार्यकारिणी सध्या अस्तित्वात नसल्याने त्या  पदांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. शेख यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्ह्यातील जेष्ठ नेते, बेसिक तालुका अध्यक्ष यांना विश्वासात घेऊन, नवीन होतकरू तरुण युवकांची दमदार फळी निर्माण करण्यासाठी व जिल्ह्यातील युवकांची संघटना मजबूत करण्यासाठी होतकरु युवकांना प्रोत्साहित करणे तसेच सर्वसामान्य जनतेत स्वच्छ प्रतिमा असलेले व शेवटच्या युवक घटकांशी संपर्क साधून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचून राबविण्यासाठी प्रयत्न करतील, अशा युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत सामावून घेतले जाईल.

नवीन जाहीर करण्यात येणाऱ्या जिल्हा कार्यकारिणीत सक्षम युवकांना संधी देऊन येत्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसची एक सक्षम कार्यकारिणी व सक्षम युवक तालुकाध्यक्ष यांची नेमणूक करुन युवक प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब शेख.व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात येईल.असे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा