You are currently viewing डामरे येथे कृषी कन्या मार्फत कृषी प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न..

डामरे येथे कृषी कन्या मार्फत कृषी प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न..

कणकवली :

डांबरे येथे कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजना 2025-26 अंतर्गत डांबरे गावांमध्ये कृषी प्रदर्शन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कृषीकन्यांनी गावातील शेतकऱ्यांना शेतीतील अवजारे, नवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय खते, बियाणे, रानभाज्या, खत व्यवस्थापन, क्रीडा व रोग नियंत्रण आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना शेतीतील समस्या व शेतीची परिस्थिती याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन त्यांनी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा डांबरे तिवरे येथे दिले.

या कृषी प्रदर्शनात कृषीकन्या पायल डोंगरे, कांचन गायकवाड, हर्षदा वरुटे, सानिका गोडसे, तन्वी अदम, अमिषा के. आर, नंदना अनिल, निर्मला परब, वैष्णवी भोसले, मानसा प्रीती तसेच मार्गदर्शक प्राचार्य पंकज संते सर, चव्हाण सर अथर्व बगाडे सर, सरपंच किरण कानडे व उपसरपंच सागर साटम हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा