सुक्यो गजाली . . .
टमरेल!

सुक्यो गजाली . . .

टमरेल!

आबा बांबार्डेकर दररोज फाटफटेक, फटफटेन बांद्यासून वाडीक येय. वाटेत इन्सुलेत रवणा-या नंदू इन्सुलकाराच्या घराकडे थांबान तेकाय वांगडाक घेवन वाडीक पुढे निघा.

एकदा तो असोच येय होतो, झुंजुमुंजू होता, बांदा- इन्सुली दरम्यान रस्त्याच्या कडेक बरेचजण बसलेले दिसत. आबाक तेंचो खूप राग येय. आबान अशाच एकाचो टमरेल लाथ मारुन उडवन दिल्यान.

नंद्याकडे येतुकच आबान तेका आपलो पराक्रम सांगल्यान. दोघय खो, खो हसत सुटले. नंद्याच्या आवशीन चहाचो कप आणून आबाच्या हातात ठेयल्यान. तितक्यात भायरसून नंद्याचे बाबा इले, ‘ काय हो, बेगीना कशे? ‘ . . . नंद्याच्या आवशीन इचारल्यान.

‘हरामी मेलो, माझो टमरेल लाथेन उडवन कोणतरी टगो, मवाली फटफटेन पळालो, सगळा पाणी ओतला! सगळो मूडच गेलो, तसोच इलय!’ नंद्याच्या बापाशीन खुलासो केल्यान, आबान गिळललो चहा घशातच अडाकलो . . .

उडाणटप्पू

aryamadhur.

प्रतिक्रिया व्यक्त करा