You are currently viewing कुडाळमध्ये ‘सिंधुदुर्ग शॉपिंग महोत्सव, फुड फेस्टीवल २०२१’ चे आयोजन..

कुडाळमध्ये ‘सिंधुदुर्ग शॉपिंग महोत्सव, फुड फेस्टीवल २०२१’ चे आयोजन..

*भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन,नाट्यप्रयोगासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी नगरसेवक राकेश कांदे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश नेमळेकर यांच्या माध्यमातून कुडाळ येथे ‘सिंधुदुर्ग शॉपिंग महोत्सव, फूड फेस्टिव्हल २०२१’चे आयोजन मंगळवारी २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याहस्ते डॉन बॉस्को चर्च ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री आ. रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, उद्योजक दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, गटनेते रणजित देसाई, कुडाळ सभापती नूतन आईर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सिंधुदुर्ग शॉपिंग महोत्सवात गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री सकाळी १० ते रात्रौ ९ या वेळेस होणार आहे. या महोत्सवात स्टॉल बुकिंगसाठी ८३२९४४७७६२, ९८२२७४२३७४, ९५०३३६६४५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा