You are currently viewing ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे उद्या मालवणमध्ये आ.वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण…

ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे उद्या मालवणमध्ये आ.वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण…

मालवण

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उद्या गुरुवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता मालवण शिवसेना शाखा येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने राज्यभर सर्वत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी त्यातील १ रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपस्थित राहणार आहेत. सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करून हा कार्यक्रम केला जाणार आहे.तरी इतर शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधिंनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर व तपस्वी मयेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 1 =