लॉकडाउन नाही, दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार

लॉकडाउन नाही, दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फिरत असलेली ती पोस्ट फेक

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडिया वर फिरत असलेली लॉकडाऊन संदर्भातील ती पोस्ट फेक असून सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या निर्बंधा प्रमाणे सायंकाळी 4 वाजेपर्यंत कणकवलीतील दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून लॉकडाऊन च्या भीतीने खरेदीसाठी गर्दी करू नये असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या नावाने गतवर्षीच्या कोविड काळातील 2 ते 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन होणार अशी जुनी पोस्ट आत्ता सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. मात्र ही पोस्ट गतवर्षीची असून सध्याच्या स्थितीत सायंकाळी 4 वाजेपर्यंत नियमानुसार मुभा दिलेली दुकाने सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. तसेच सायंकाळी 5 नंतर संचारबंदी चे आदेश आहेत.

त्यामुळे या आदेशा प्रमाणेच शासन नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून दुकाने बंद होतील या भीतीने खरेदीसाठी गर्दी करू नये. नियमानुसार कणकवली शहरातील दुकाने देखील सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा