You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून संविता आश्रमास संगणक संच प्रदान

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून संविता आश्रमास संगणक संच प्रदान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त पणदूर येथील संविता आश्रम निराधार संस्थेस आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून संगणक संच प्रदान करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अतुल बंगे, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव यांनी संविता आश्रमास भेट देऊन व्यवस्थापकांकडे संगणक संच सुपूर्द केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा