कुडाळ तालुक्यात ५ पासून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे
कुडाळ
उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (सिंधुदुर्ग) यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय (क स्तर, कुडाळ) व कुडाळ तालुका वकील संघटना यांच्यावतीने ५ ते ७फेब्रुवारी या कालावधीत कुडाळ तालुक्यात जनजागृतीपर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे व मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तींना कायद्याची ओळख व माहिती मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता झाराप ग्रा.पं. कार्यालय येथे अॅड. एस. एस. सावंत, तर ‘समाजातील महिलांची सुरक्षा व गोपनियता’ विषयावर अॅड. रुपाली कदम मार्गदर्शन करणार आहेत. ६ रोजी सकाळी १० वाजता तेर्सेबांबर्डे ग्रा.पं. कार्यालय येथे ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता माणगाव ग्रा.पं. कार्यालय येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन केले आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश (क स्तर) जी. ए. कुलकर्णी व सहदिवाणी न्यायाधीश (क स्तर) पी. आर. ढोरे यांनी केले आहे.