You are currently viewing सावंतवाडीतील दुहेरी खुनाच्या आरोपीला घेतले पुन्हा पोलीस कस्टडीत

सावंतवाडीतील दुहेरी खुनाच्या आरोपीला घेतले पुन्हा पोलीस कस्टडीत

खुन प्रकरणाला दुसरी बाजू आहे का? उभा राहिला प्रश्न

सावंतवाडी उभाबाजार येथे झालेल्या दोन वृद्ध महिलांच्या खून प्रकरणात कुशल नागेश टंगसाळी या युवकास अटक होऊन एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. आरोपीने कर्ज वाढल्याने पैशांची असलेली चणचण यामुळेच चोरीच्या उद्देशानेच खून केल्याची पहिल्या दिवशीच कबुली देत खुनासाठी वापरलेला चाकू व वितळवलेलं सोनं, खुनाच्या वेळी वापरलेले कपडे व रक्त लागलेली चप्पल आदी वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. आरोपीने खुनाची कबूली दिल्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कस्टडीमध्ये करण्यात आली होती.

संशयित आरोपीला का घेतला पुन्हा पोलीस कस्टडीत

तीन दिवसांनी अचानक सावंतवाडी पोलिसांनी “कहाणी मध्ये ट्विस्ट” आणून दोन वृद्ध महिलांच्या खून प्रकरणात न्यायालयीन कस्टडीत असलेला संशयित आरोपी कुणाल टंगसाळी याची न्यायालयीन कस्टडी रद्द करून आणखी तपास करणे गरजेचे असल्याचे सांगून सावंतवाडी पोलिसांनी संशयित आरोपीला पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये घेतला. पोलिसांनी अचानक संशयितास पोलीस कस्टडीमध्ये घेतल्यामुळे खून नक्की कोणी केला? कुणाल सोबत आणखी कोण सामील होते का? किंवा खुनाचे वास्तव वेगळेच आहे की काय? असे अनेक प्रश्न आज पुन्हा फिरून उभे राहिले आहेत.
कुणाल हा सोनार आहे आणि सहा ग्रॅम सोन्याच्या चैन साठी खून करू शकतो का? आपल्यावरील पाच लाखांच्या कर्जापोटी सोन्यातून मिळणाऱ्या २५/३० हजारांसाठी आपले आयुष्य खुनासारख्या जुगारावर लावेल का? हा न सुटणारा प्रश्न अनेक तर्कवितर्कांना जागा निर्माण करून देतो. आपली बायको दोन छोटी मुले असताना किरकोळ सोन्यासाठी एवढं गंभीर पाऊल कसं काय उचलले हे मात्र एक कोडंच निर्माण झालं आहे. कुणालंच गुन्हा दाखल करताना पोलीस स्टेशनमध्ये हजर असणे, खून झालेल्या व्यक्तीचा भाचा आणि प्रॉपर्टीचा मालक आल्यावर त्याच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये हजर असणे, गुन्हा घडलेल्या ठिकाणी पंचनामा सुरू असताना देखील बिनधास्त वावरणे, मृत शालिनी सावंतच्या मुलासोबत सहज वावर आदी बाबींचा विचार केला असता स्वतः खून केलेला व्यक्ती एवढा निडरपणे अशा सर्व गोष्टींमध्ये कसा काय सामील होऊ शकतो? कुणालचा स्वभाव आणि जनमानसात असलेली ओळख याच्या विरुद्ध वर्तन त्याचे खुनाच्या दुसऱ्या दिवशी आढळून आले होते. त्यामुळे एकंदरीत प्रकरण गुंतागुंतीचे असल्यासारखे वाटत आहे.
कुणालला दिनांक १८/११/२१ रोजी पुन्हा एकदा पोलिसांनी पोलीस कस्टडी मागून ताब्यात घेतल्यामुळे घडलेल्या घटनेला नवीन काहीतरी वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चोरी हा एकच उद्देश खुनाच्या मागे आहे की जमीन प्रकरण हे खरे कारण आहे? खून एकट्या कुणाल ने केला की आणखी कोणाचा सहभाग होता? खूनासाठी वापरण्यात आलेल्या सुरीनेच खून झाला की दुसरे हत्यार वापरण्यात आले? कुणाल खून करून चौकशी नंतर वेंगुर्ला येथे एकदा विष प्राशन करून सापडला पण दुसर्यावेळी तो मुंबईत कसा गेला? आणि पळण्यासाठी इतर ठिकाणी न जाता मुंबईतच का गेला? पैशांच्या चणचणीमुळे व कर्जबाजारी झाल्याने जर खून केला मुंबईत जाण्यासाठी पैसे कुठून आले? नाशिकला कोणाकडे जात होता? असे अनेक प्रश्न पोलिसांनी पुन्हा कस्टडीमध्ये घेतल्याने उभे राहिले आहेत.
कुणालला पुन्हा ताब्यात घेतल्यामुळे खून प्रकरणाला आणखी काही बाजू आहेत का? की खून कुणालने केवळ २५/३० हजारांच्या सोन्यासाठीच केला ही न पटणारी गोष्टच सत्य आहे याचा उलगडा लवकरच होईल…तूर्तास…wait and watch….

प्रतिक्रिया व्यक्त करा