You are currently viewing भाजप नेते निलेश राणे यांचे कुडाळ तालुक्यातील नारुरच्या महालक्ष्मीला साकडे

भाजप नेते निलेश राणे यांचे कुडाळ तालुक्यातील नारुरच्या महालक्ष्मीला साकडे

भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील नारुरच्या जागृत महालक्ष्मीचे दर्शन घेतले. कोकण आणि महाराष्ट्रावरील संकटांचे हरण कर, असे साकडे त्यांनी देवीला घातले.

गावकर राजा तेली,मंदिरचे पुजारी यांनी नारळ श्रीफळ,महालक्ष्मीची प्रतिमा देऊन राणे यांचा सत्कार केला.

यावेळी निलेश राणे यांच्यासमवेत कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, ओबीसी मोर्चा सेल जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सभापती मोहन सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, युवा नेते विशाल परब, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,कुडळाचे माजी नगरसेवक सुनिल बांदेकर,ता उपाध्यक्ष राजा धुरी, भाजपचे कार्यकर्ते योगेश घाडी, विनोद सावंत, प्रिंतेश गुरव,अवधूत सामंत,विश्वास पांगुळ,संदेश सुकळवाडकर,तसेच त्यावेळी नारूर गावचे सरपंच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा