You are currently viewing खासदार सुप्रिया सुळे यांचे कुडाळ येथे राष्ट्रवादीचे कणकवली जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले जल्लोषी स्वागत

खासदार सुप्रिया सुळे यांचे कुडाळ येथे राष्ट्रवादीचे कणकवली जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले जल्लोषी स्वागत

कुडाळ

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष अदिती नलावडे सध्या सिंधुदुर्ग ज़िल्हा दौऱ्यावर असून आज त्यांचे कुडाळ येथे राष्ट्रवादी कणकवली तालुक्याच्या वतीने ढोल ताशा च्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सुप्रिया ताईंचे स्वागत केले. सोबत जिल्हाध्यक्ष अमित सामंत तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक उपस्थित होते.

यावेळी प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, निलेश गोवेकर, रुपेश जाधव, समीर आचरेकर, राजू गोसावी, अविनाश चव्हाण, नाता मालाडकर, चंद्रकांत नाईक तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुप्रिया ताई सुळे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + seventeen =