You are currently viewing सुप्रिया सुळेंकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी 

सुप्रिया सुळेंकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी 

किल्ल्यावर एकही स्वच्छतागृह नाही ; महिला पर्यटकांची सुप्रिया ताईंकडे तक्रार

मालवण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ल्यातील अस्वच्छता आणि मंदिराच्या दुरावस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आपण स्वतः राज्य आणि केंद्र सरकारसोबत बोलून पाठपुरावा करू, असे त्या म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डाँटस, माजी मंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे, अबिद नाईक, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, प्रमोद कांडरकर, पं. स. सदस्य विनोद आळवे, उद्योजक सतीश आचरेकर, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, पुंडलिक दळवी, सदप खटखटे, बाबू डायस, सौ. ज्योती तोरस्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी किल्ल्यावरील अस्वछतेची पाहणी करून नाराजी व्यक्त केली. तसेच येथील कचऱ्याचे त्यांनी फोटोग्राफ घेण्याची सूचना देखील त्यांनी आपल्या सोबत आलेल्या फोटोग्राफरला केली. यावेळी किल्ल्यावर एकही स्वच्छता गृह नसल्या बाबत येथे आलेल्या महिला पर्यटकांनी सुप्रिया ताईंकडे तक्रार केली. त्यावर याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करू, असे त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा