You are currently viewing फोंड्यात दीड तास बरसला पाऊस

फोंड्यात दीड तास बरसला पाऊस

कागदी लगद्यापासून बनविलेले नरकासुर गेले भिजून ; व्यापाऱ्यांचेही नुकसान

कणकवली

कणकवली तालुक्यात आज संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुलांनी कागदी लगद्यापासून बनविलेले विविध प्रकारचे नरकासूर पावसात भिजून गेले. त्यामुळे बच्चेकंपनीच्या आनंदावर विरजण पडले. तसेच दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना पावसाने रोखल्यामुळे व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले.

आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. फोंड्यात सलग दीड तास पावसाच्या सरी बरसल्या. उद्या नरक चतुर्दशी असल्याने आज मध्यरात्री नरकासुराचे दहन केले जाते. त्यानिमित्त अनेक ठिकाणी कागदी लगदा तसेच इतर वस्तूंपासून नरकासुराचे पुतळे बनविले जातात आणि त्यांचे दहन केले जाते. फोंड्यातही अनेक ठिकाणी असे नरकासुर बनविण्यात आले होते. परंतु अवकाळी पावसाने ते भिजून गेले. तसेच दिवळीनिमित्त खरेदी करणारे गिर्‍हाईकही पावसामुळे येऊ न शकल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 7 =