You are currently viewing माजगाव वन विभागामार्फत ओटवणे शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांना वन्यजीवनाविषयी मार्गदर्शन

माजगाव वन विभागामार्फत ओटवणे शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांना वन्यजीवनाविषयी मार्गदर्शन

सावंतवाडी :

 

वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन माजगाव वन विभागाच्यावतीने ओटवणे शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्व, वन्यजीव संरक्षण कायदे व विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव, जंगल सुरक्षा, पर्यावरण संरक्षण याबाबत जाणिव जागृती व्हावी या उद्देशाने मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजगाव वन विभागाचे वनपाल प्रमोद राणे, ओटवणे शाळा नं २ च्या मुख्याध्यापिका प्रतिभा तुळसकर, शिक्षक श्री. होडावडेकर, ओटवणे वनरक्षक महादेव गेजगे, कोलगाव वनरक्षक ब्रम्हकुमार भोजणे आदी उपस्थित होते.

वन्यजीवाचे महत्त्व मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे वनाविषयी व प्राण्याविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी शासनाच्यावतीने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्य जीव सप्ताहाची सुरुवात १९५२ सालापासून भारत देशामध्ये सुरुवात झाली.

यावेळी वनपाल प्रमोद राणे यांनी वन्य जीवामध्ये पशु पक्षी यांचे जतन, संवर्धन केले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे कार्य् आपल्या हातून घडणार असल्याचे सांगुन वन्य पशु पक्षी हे आपले शत्रू नसून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे ते एक साधन आहे. तसेच त्यांनी यावेळी यावेळी मुलांना वन्यजीवांच निसर्गातील व मानवी जीवनातील महत्त्व सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा