You are currently viewing मालवण – कुडाळ मध्ये काँग्रेसच किंग मेकर राहणार – अरविंद मोंडकर

मालवण – कुडाळ मध्ये काँग्रेसच किंग मेकर राहणार – अरविंद मोंडकर

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त निरीक्षक श्री. विनायक देशमुख हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक कुडाळ विधानसभा मतदारसंघात MIDC येथील शासकीय निवासस्थान येथे घेतली

यावेळी कुडाळ निरीक्षक तथा विधानसभा२०१९ चे पक्षाचे उमेदवार अरविंद मोंडकर यांनी श्री. देशमुख यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं
येणाऱ्या मालवण नगरपरिषद व कुडाळ नगरपंचायत निवडणूक मध्ये या मतदारसंघातील दोन्ही तालुक्यात आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणून दोन्ही ठिकाणी काँग्रेसच किंगमेकर होणार अशी ग्वाही मोंडकर यांनी निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस श्री. देशमुख यांस दिली

गेल्या वेळी दोन्ही ठिकाणी काँग्रेस सदस्यांची झालेली निवड पाहता आजही पुन्हा त्या त्या वार्डात मतदारांचा कौल पुन्हा काँग्रेस लाच मिळणार असल्याची चाचपणी आम्ही केली आहे

सध्याच्या महागाईला जनता कंटाळली असून पूर्वी प्रमाणे काँग्रेसपक्ष हाच आपला तारणहार असल्याचं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केल्याचं मोंडकर यांनी सांगितलं

कुडाळ शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित होते

यावेळी देशमुख यांनी आपण स्वतः पक्षात आपल्या कामाचा अनुभव देखील युवा कार्यकर्त्यां समोर मांडला त्याच प्रमाणे या ठिकाणच्या महिलांना देखील सक्षम करण्यासाठी मंत्री. यशोमतीताई ठाकूर यांचा दौरा लवकरच लावूया अस देखील सांगितल
दरम्यान केंद्रसरकारने खाद्यपदार्थ, इंधन, गॅस, लोखंड जीवनावश्यक वस्तूं यांवरील वाढलेला खर्च वाढती महागाई यावर जिल्ह्यातील सामन्यांच्या खिश्याला चटका लागला असल्याची खंत देखील देशमुख यांनी व्यक्त केली

त्यानुसार मालवण व कुडाळ याठिकाणी गावात, वाडीत, बाजारपेठ मध्ये सुध्दा जनते मध्ये जाऊन केंद्रसरकरच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी जनजागरण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचं मोंडकर यांनी सांगितलं
यावेळी जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकास भाई सावंत, प्रकाश जैतापकर, इर्शाद शेख, नागेश मौरये, विभावरी सुखी, सुगंधा साटम, नीता राणे, कौस्तुभ गावडे, रघू नार्वेकर मेघनाथ धुरी आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =