दोडामार्ग
तिलारी धरणाच्या कालव्यात दोन भले मोठे गवे कोसळल्याचा प्रकार आज दोडामार्ग-गोवा सीमेवर इब्रामपूर येथे घडला. ही घटना वनविभागाला कळल्यानंतर त्या ठीकाणी गोवा वनविभागाच्या अधिकार्यांनी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा वनविभागाने आपत्ती विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने दोरी घालून त्यांना बाहेर काढले. याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी अनिल केरकर यांनी दिली.
ही घटना आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान दुपार पर्यत हे बचावकार्य सुरू होते. दोन्ही गव्यांना बाहेर काढण्यात यश आल्यानंतर वनविभाग आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या सर्व घटनेबाबत सिंधुदुर्गचा वनविभाग अनभिज्ञ होता.