You are currently viewing शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादीने घेतली मुख्याधिकारी महापात्रा यांची भेट…

शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादीने घेतली मुख्याधिकारी महापात्रा यांची भेट…

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली वेधले विविध विषयांवर लक्ष

सावंतवाडी :

शहरातील समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संजीता महापात्रा यांची भेट घेतली. मुख्याधिकारी यांना उद्घाटने केलेले शहरातील प्रकल्प बंदावस्थेत असून प्रशासनाचा निधी खर्च करून त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नसल्याबाबत विचारणा केली. तर स्विमिंगपूलच्या झालेल्या दुरावस्थेबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला. स्विमिंगपूल बंद असून पाण्यावर तवंग आला आहे. डासांची उत्पत्ती या पाण्यात निर्माण झाली आहे. यामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवण्याची शक्त्या आहे अस मत शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी व्यक्त केल. तर याबाबत मुख्याधिकारी संजीता महापात्रा यांची भेट घेत जाब विचारला. उद्घाटने केलेले शहरातील प्रकल्प बंदावस्थेत असून प्रशासनाचा निधी खर्च करून त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून तो न.प.कडून उचलला जात नसल्याची तक्रार केली. तसेच गटारांमध्ये, तलावामध्ये सांडपाणी सोडले जात असून त्यामुळे डासांच्या उत्पतीसह दुर्गंधी होत असल्याची तक्रार केली. याकडे मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, जाहीर ख्वाजा, शफिक खान, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू, संतोष जोईल,असिफ ख्वाजा, सुर्यकांत नाईक आदि राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eight =