सावंतवाडीतील व्यक्तीचा परुळे खाडीत मृतदेह

वेंगुर्ले

भोगवे, तेरावळे वाडी जेटी, परुळे येथे
महेश सखाराम परब (वय 40) रा. कारिवडे अपट्याचे गाळू, सावंतवाडी यांचा मृतदेह खाडीमध्ये पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेहाची ओळख नातेवाईक न्हाणू संभाजी दळवी ( रा.विलवडे सावंतवाडी) यांनी पटवून दिल्याने निवती पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी कोळी यांनी शवविच्छेदन करणेबाबत तजवीज ठेवली आहे.
तसेच सदर मृत व्यक्ती ही सावंतवाडी पोलीस ठाणे येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा