ग्रामीण रुग्णालयात फळे तर फातिमा आश्रमात धान्य वाटप
मालवण
शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस सोमवारी शिवसेनेकडून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच फातिमा आश्रमात धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, दीपक देसाई, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, प्रसाद आडवलकर, बाळू नाटेकर, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.