You are currently viewing मला एक दिवसाचा सहाय्यक कामगार आयुक्त केले तर?
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

मला एक दिवसाचा सहाय्यक कामगार आयुक्त केले तर?

लेख सादर: अहमद मुंडे

# कामगार देवो भव# जगाच्या सर्वात मोठया अर्थक्रांतीचा कणा बांधकाम कामगारच आहे कारण. बांधकाम क्षेत्रातून सर्वात मोठा आयकर शासनाला मिळतो दिवसभर उन्हात घाम गाळून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणारा बांधकाम कामगार. हक्काच्या विविध मागणीसाठी निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन करणारे खरोखरच कामगारांसाठी कोणच काही करत नाही माझ्या माग किती लोक आहेत कोण नेता मला बोलावतो काय ? काय देतोय का ? कामगार दबाव. गुंडगिरी बेकायदा वसुली. कामगाराना लुटण्याचे प्रमाण जास्त वाढले की मग एखाद्या नेत्याच्या छत्रछायेखाली दडणारे कामगारांचे काय भल करणार. कोरोना काळात बांधकाम कामगार उपाशी होता हाताला काम नव्हते त्यावेळी एक रस्त्यावर होता का ? आत्ता आले कूठुन ? कामगार जाग व्हा ? कोणालाही आपल्या मंडळाच्या लाभातील एक रूपया सुध्दा देवू नका ? सुरक्षा संच दर ५०० चालू आहे. एक रूपया सुध्दा देवू नका ? सहायक कामगार आयुक्त भवन मधील एकादा अधिकारी व कर्मचारी जर तुम्हाला म्हणाला तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे. तर त्याची तक्रार लेखी करा आम्ही त्याची खबरबात घेऊ
शासकीय निमशासकीय कार्यालये आपल्या हितासाठी तयार करण्यात आली आहेत. त्या त्या आयुक्त भवन मध्ये त्या त्या जिल्हा तालुका या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त नेमण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक अडाणी गरजू अशिक्षित कामगार यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून राबविण्यात येणारया स्वता बांधकाम कामगार. मुल. महिला. यांचेसाठी आरोग्य योजना. आर्थिक संरक्षण. विमा संरक्षण. मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना. कामगार सुरक्षा. कामगार पेन्शन योजना. अशा एक ना अनेक योजना राबविल्या जातात. त्यासाठी आवश्यक असणारे इंजिनिअर प्रमाणात. ९० दिवस कामांचे प्रमाणपत्र. याची आवश्यकता असते आणि ते देण्याचा अधिकार मंडळाने इंजिनिअर लोकांना दिला आहे. जागोजागी संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय संघटना सामाजिक संघटना अशी विविध दुकानें तयार झाली. कामगार नेते कामगार हितचिंतक. यांना आपल्या जिल्ह्यात उत आला आहे यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे बांधकाम कामगार कार्यालयातील. अधिकारी व कर्मचारी यांना फितुर असणारे सहाय्यक कामगार आयुक्त
मी कोण नेता नाही पुढारी नाही आहे तो म्हणजे कामगारांना संबोधन प्रबोधन करणारा एक मामुली कामगार. मी आज आपल्या सर्वांच्या कडे एक मागणी करत आहे एक दिवस मला सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून काम करणयाचा अधिकार द्या. आज सर्वात मोठे दोन नंबर आहे ते म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये. आहे सर्वात महत्वाचे काम करावे लागेल ते म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये मुक्काम करणारे संघटना वाले यांना हाकलणे हे माझे पहिले काम असेल कोणी परवानगी दिली यांना आॅफिस मध्ये ढवळाढवळ करायची. ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी यांना आत येण्याची परवानगी दिली त्यांना नोकरीवरून काढून टाकले पाहिजे सहाय्यक कामगार आयुक्त भवन चया आवारात टेबल घेऊन दिवसाढवळ्या कामगारांना आर्थिक लुटणारे पहिले हाकलून धया सहाय्यक कामगार आयुक्त भवन चया आसपास सुध्दा कोणी एजंट दलाल संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष दिसला नाही पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीन.
कामगार नोंदणी साठी इंजिनिअर दाखले देतात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते तो मंडळाने दिलेला अधिकार आहे पण आज काही इंजिनिअर लोक ठराविक रक्कम घेऊन नोंदणी दाखले देत आहेत. जे इंजिनिअर असे कामगार नोंदणी दाखले देतात. # त्यांनी ज्या बांधकाम कामगार यांना दाखला दिला आहे # त्या बरोबर ९० दिवस कामांचे हजेरी पत्रक जोडणे बंधनकारक करीन # पगार पत्रक रोज पगार देत असेलतर शपथपत्र जोडणे बंधनकारक करिन # पगार बॅंकेतून दिला जात असेल तर बॅंक खात्याचे स्टेटमेंट जोडणे बंधनकारक करिन # त्यामुळे बोगस कामगार नोंदणी होणार नाही. सर्वात पहिलें आत्तापर्यंत ज्या ज्या इंजिनिअर लोकांनी कामगार नोंदणी दाखले दिले आहेत त्यांना नोटिसा बजावून. खरोखरच दाखले दिलेले कामगार त्यांच्याकडे कामाला आहेत का याची चाचपणी तपासणी करीन. ज्यांनी जेवढे कामगार नोंदणी दाखले दिले तेवढे कामगार त्यांच्याकडे कामाला नसल्यास अशा इंजिनिअर लोकांचें रजिस्ट्रेशन रद्द करून त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली अंतर्गत दंडात्मक कारवाई करीन.यामुळे बोगस कामगार नोंदणी बंद करण्यासाठी पहिलें पाऊल टाकले जाईल.
२०२० मध्ये कामगार अपघातात मृत्यू होऊ नये यासाठी मंडळाने सुरक्षारक्षक संच वाटप केले होते त्या अंदाजानुसार २८३०० सुरक्षा संच वाटप करण्यात आले. त्यामध्ये असे आढळून आले की मिळतय घया. कोणीही त्यासाठी अर्ज भरु लागला. यामध्ये महिला संख्या जास्त आहे. आणि दुःखाची बातमी म्हणजे जिल्ह्यात कोठेही कोणताही महिला पुरुष कामगार या सुरक्षा संच वापरत नाही. मंडळाला ज्या प्रमाणे सुरक्षा संच वाटप करण्याचा अधिकार आहे त्यानुसार तो वापरला जातो का नाही याचा सुध्दा अधिकार मडळाला व सहाय्यक कामगार आयुक्त यांना आहे कामगार भवन मध्ये अधिकारी व कर्मचारी कमी असलयासा जिल्ह्यात कामगारांच्या हितासाठी काम करणारे समाजसेवक. युनियन संघटना आहेत यांची नेमणूक सुरक्षा संच वापर होतो का नाही हे बघण्यासाठी करीन. प्रत्येक तालुक्यात एक दिवस बांधकाम जिथे जिथे चालू असेल तिथे जाऊन कामगाराची सुरक्षा संच वापर होतो का नाही हे बघण्याचा अधिकार देईन. ज्याला सुरक्षा संच मिळाला आहे तो बांधकाम कामगार आहे का नाही. अशी कोणतीही सबब आढळल्यास. शासनाची चुकीची माहिती देऊन फसवणूक केली या अंतर्गत बांधकाम कामगार व तो बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करणारे इंजिनिअर यांच्यावर दंडात्मक अटकेची कारवाईची. करण्याचे आदेश काढीन.
सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय सामाजिक संघटना. यांचा कामगार भवन मध्ये येणारा संपर्क थांबवा. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांना आॅफिस मध्ये घेऊन येवून सहायक कामगार आयुक्त यांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार हितचिंतक नेते यांचा वावर त्वरित थांबविन. असे करणारे कामगार हितचिंतक यांच्यावर आॅफिस कामामध्ये अडथळा आणणें यासाठी कारवाई करण्यात यावी. अशी तरतूद करण्यात येईल. कामगार भवन येथे काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईल मध्ये कामगार हितचिंतक व अन्य लोक यांचें नंबर कशासाठी काय काम आहे त्या नंबरचे ? ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईल मध्ये कामगार हितचिंतक व अन्य कोणत्याही इसमाचा मोबाईल नंबर आढळल्यास त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची तरतूद केली जाईल तुम्ही शासनाचे कर्मचारी आहात मग बाकीच्या कोणाचाही नंबर तुमच्यात कशासाठी पाहिजे सबळ कारण नसल्यास हाकलपटटी करण्यात येईल. आॅनलाइन पध्दतीने नोंदणी होत असताना आपल्या कामात कुचराई करणारे अधिकारी व कर्मचारी यांना चांगला चाफ लावला जाईल. वेळेवर मॅसेज पाठविणे. स्मार्टकार्ड वेळेवर मिळते का नाही याची दक्षता घेणे. सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये कामगार आणि अधिकारी व कर्मचारी समोर असेच धोरण अंमलात आणले जाईल.# नो वशिला नो पैसा. #
मी जे काय मत मांडले किती जणांना पटले किती लोकांना पटले नाही. ज्यांना पटल त्यांनी उठाव करण्यासाठी मदत करा आणि ज्यांना पटल नाही त्यांनी आपलं सगळ जीवन वेचले आहे ते कामगार भल करण्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी. ज्यांना काही काम त्यांच्यासाठी मोकळ कुराण म्हणजे बांधकाम कामगार.
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − one =