You are currently viewing सावंतवाडीत एसटी कर्मचाऱ्यांनी भजन करत आपल्या मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष…

सावंतवाडीत एसटी कर्मचाऱ्यांनी भजन करत आपल्या मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष…

सावंतवाडी

येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आज भजन आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही कायम आहे. दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येथून माघार घेणारच नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

यावेळी मंगेश नानचे, अजित कदम, रावजी राणे, रमाकांत जाधव, कमलाकर अंबाड, अमित नाईक, प्रवीण साळगांवकर, संजय निवेलकर, गजानन गावकर, अमरनाथ दळवी, प्रमुख निर्भया सारिका म्हाडगुत, पूजा जाधव, सिंधू गायकवाड, गीता निकम, मनीषा गायकवाड, प्रमिला मांजरेकर, सरिता हेडगे, सुप्रिया चव्हाण आदी मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा