You are currently viewing ही तर नगरसेवक विराज भोसले यांची निष्क्रियता

ही तर नगरसेवक विराज भोसले यांची निष्क्रियता

*शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांची टीका*

कणकवली :

कणकवली शहरातील सोनगेवाडी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट दीड महिना बंद असणे ही स्थानिक नगरसेवक विराज भोसले यांची निष्क्रियता असल्याची जोरदार टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केली आहे.

 

सोनगेवाडी येथील मारुती मंदिर पासून गार्डन पर्यंत ची स्ट्रीट लाईट दीड महिना बंद होती. स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्री अपरात्री तेथील रहिवाशांना अंधारातून ये-जा करावी लागत होती. या समस्येबाबत सोनगेवाडीतील रहिवाशांनी नगरसेवक विराज भोसले यांचे वारंवार लक्ष वेधले होते. नगरसेवक निवडणुकीत मतदारांचे उंबरठे झिजवताना विराज भोसले यांनी आपल्या सगळ्या समस्या तात्काळ दूर करू, तुमच्या अडीअडचणीला रात्रंदिवस धावून येईन असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीत मते मागताना मतदारांना दिलेल्या पोकळ आश्वासनांचा विराज भोसले यांना विसर पडला असून दीड महिना बंद असलेली साधी स्ट्रीटलाईट ही ते दुरुस्त करू शकले नाहीत.  स्थानिक नागरिकांना मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवावा लागला. नगरसेवक विराज भोसले यांनी सोनगेवाडीतील  स्ट्रीट लाईट दुरुस्ती चे श्रेय घेण्याऐवजी दीड महिना रस्ता अंधारात ठेवणे ही नगरसेवक म्हणून स्वतःची निष्क्रियता आहे हे आधी कबुल करावे अशी टीका सुजित जाधव यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा