You are currently viewing निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात दाखल्यावर स्वाक्षरी करुन बँकेमार्फत सादर करावे

निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात दाखल्यावर स्वाक्षरी करुन बँकेमार्फत सादर करावे

–  जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत

 सिंधुदुर्गनगरी

निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी घोषणापत्र/ हयात दाखल्यावर दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत निवृत्ती वेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांची, स्वाक्षरी घेऊन त्यांच्या नावाखाली त्यांचा मोबाईल क्रमांक नमूद करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात यावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 बँकाच्या 162 शाखांना पुढील बाबतीत कळविलेले आहे.

            तथापि सर्व निवृत्तीवेतन धारकांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पूर्वी बँकेत पाठविलेल्या घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी. (निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाचे अधिपत्याखालील प्राधिकरणात नोकरी स्वीकारलेली नाही, तसेच पुनर्विवाह केलेला नाही (पुनर्विवाह तरतुद 60 वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्तीवेतन धारकांना लागू नाही). अशा कोणत्याही घटनेची माहिती कोषागार/बँक यांना कळविणे बंधनकारक राहील).

            सद्यस्थितीत ज्या निवृत्तीवेतनधारकांचे मोबाईल क्रमांक कोषागार कार्यालयाकडे व बँकेकडे उपलब्ध आहेत त्यांना जमा रक्कमेची माहिती संदेशाव्दारे (SMS) कळविली जाते. मात्र ज्यांनी मोबाईल क्रमांक कळविलेला नाही त्यांना या सुविधेपासून वंचित रहावे लागते. यास्तव तसेच नजिकच्या कालावधीत जमा रक्कमेचा सविस्तर तपशिल मोबाईलवर उपलब्ध करुन देण्याची सुविधा प्रस्तावित आहे. तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी आपल्या नावाखाली / स्वाक्षरीच्या खाली आपला मोबाईल क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे.

80 वर्ष व त्यावरील कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या कुटुंबनिवृत्ती वेतनात दिनांक 01 एप्रिल 2014 पासून 10 टक्के वाढ करण्यासाठी वयाचा पुरावा उपलब्ध नसल्याने जन्म तारखेचा दाखला घोषणापत्र / हयात दाखल्यासोबत बँकेमार्फत सादर करणेबाबत. दिनांक 09 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार 80 वर्षे व त्यावरील कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या जन्मतारखेचा पुरावा यापुर्वी कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर केलेला नाही. दिनांक 23 मार्च 2015 च्या शासन परिपत्राकानुसार, निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक 01 एप्रिल 2014 पासून 10 टक्के वाढ केलेली आहे. त्याप्रमाणे वाढीव लाभ देण्यासाठी आता ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना 80 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यांनी तसेच भविष्यात 80 वर्ष पूर्ण होणाऱ्यांकडून वयाचे पुरावे मागवून सदरचा लाभ देण्यासाठी भविष्यात विलंब होवू नये. यासाठी सर्व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पूर्वी खालीलपैकी एक पुरावा बँकेमार्फत पाठवावयाच्या घोषणापत्र/ हयात दाखाल्यासोबत सादर करावा. 1. जन्म तारेखेचा पुरवा (उदा. जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला इ.) ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकाकडे अतिरिक्त कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेसाठी आवश्यक असलेला जन्म तारखेचा वैध पुरवा उपलब्ध नसेल अशा प्रकरणी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा. 2. जन्म तारखेचा पुरावा असलेली अधिप्रमाणित (Authentic) कागदपत्रे जसे आधार कार्ड, पॅनकार्ड इ. 3. अपवादात्मक प्रकरणी कुटुंब निवृत्तीवेतन धारकाकडे आधार कार्ड, किंवा पॅन कार्ड  उपलब्ध नसल्यास त्याचे किंवा तिचे ज्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य आहे, त्या जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांचे वयाचे प्रमाणपत्र, त्यांने किंवा तिने सादर करावे (कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्रासह त्यांच्या / तिच्या हयात असलेल्या अपत्यांच्या वयाचे दाखले सादर करावेत.)

            तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या विवाह पूर्वीच्या व आत्ताच्या नावात फरक असल्यास त्यांनी या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 9 मार्च 2015 च्या शासन निर्णयानुसार स्वयं घोषणापत्र व शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला सादर  करावा. जेणेकरुन या संदर्भातील लाभ देणे सुलभ होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 9 =