You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न

वैभववाडी

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभाग आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ कोकण ग्रामीण बँक रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक श्री.बी.पी.सामंत, जिल्हा अग्रणी बँक सिंधुदुर्गचे प्रबंधक श्री. मुकेश मेश्राम, विदर्भ कोकण ग्रामीण बँक भुईबावडा येथील शाखाधिकारी श्री.प्रसाद धुरी, उपप्राचार्य प्रा.डॉ. एम.आय.कुंभार, हिंदी विभाग प्रमुख प्रा.ए.एम.कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘वित्तीय और डिजिटल साक्षरता एक विचारमंथन ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे बी.पी.सामंत यांनी आजचे युग हे डिजिटल युग आहे. डिजिटल साक्षरतेचे महत्त्व सांगून बँकेतील डिजिटल कामकाजाची माहिती दिली. डिजिटल साक्षरता या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. डिजिटल साक्षरतेचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. मुकेश मेश्राम यांनी संवादामध्ये भाषेचे महत्त्व सांगत असताना बँकेमध्ये भाषेचे स्थान याबाबतचे विवेचन आपल्या भाषणात केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे यांनी हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा देऊन हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शरदचंद्र रावराणे यांनी भाषेच्या मधुरतेबाबत विचार व्यक्त करून हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कु.तन्वी पवार, मनस्वी शिंदे आणि रितेश शिवगण या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. हिंदी दिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘हिंदी निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम कु.अश्विनी संतोष पांचाळ, द्वितीय कु. रेणुका सुरेश नागप, तृतीय कु. सलोनी संतोष पवार, उत्तेजनार्थ कु.प्रज्ञा मंगेश कोलते, कु. तेजस्वी सुरेश रहाटे, कु. दीपा दिनेश तेली या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए.एम.कांबळे यांनी केले. आभार डॉ. डी.वाय. लंगडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन.ए.कारेकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − three =