You are currently viewing संवाद मीडियाच्या बातमीनंतर जुगाऱ्यांचे बांदिवडे येथील बस्तान उठले…

संवाद मीडियाच्या बातमीनंतर जुगाऱ्यांचे बांदिवडे येथील बस्तान उठले…

नवा जुगाराचा अड्डा बसला खारेपाटणच्या सीमेवरील गोडबनाच्या हॉटेलात

खाकीच्या आशिर्वादाने सुशेगाद बांदिवडे येथील गणपती मंदिर च्या मागे बसलेली जुगाराची तकशीम संवाद मीडियाच्या बातमीनंतर खाकीच्याच सहकार्याने उठली. मीडियामध्ये बातमी आल्यानंतर धसका घेतलेली जुगारी मंडळी पोलिसांच्याच इशाऱ्यानंतर तात्काळ बांदिवडेचा अड्डा गुंडाळून पसार झाले.
खरंतर मीडियामध्ये बातमी आल्यावर पोलिसांकडून जुगाराच्या अड्ड्यावर तात्काळ धाड पडणे आवश्यक होते. परंतु खाकीच्या झारीतील शुक्राचार्याच्या कृपेमुळे जुगारी मंडळींना सावध केले गेल्यामुळे पुन्हा एकदा जुगाऱ्यांचा ताफा नवीन जागेच्या शोधत जिल्ह्याच्या सीमेवरील खारेपाटणच्या पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोड बनाच्या हॉटेलात बसला आहे.
जिल्ह्यातील जुगाराच्या अड्ड्यात लाखो रुपयांची तकशीम असते. एका दिवसात १५/२० लाख रुपयांचा चुराडा होत असतो. लाखो रुपयांचे डाव खेळले जातात आणि खाकीलाही तसाच भरभक्कम हफ्ता मिळतो. त्यामुळेच जुगाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी खकितील घरभेदी मदत करत असतात. बांदिवडे येथे बसलेल्या जुगाराच्या अड्ड्यातील ७५००००/- लाख रुपये तकशीम असलेल्या जुगाऱ्यांनी आपापसात वाटून घेतले आहेत.
बांदिवडे येथील तळ उठल्यानंतर फोंडयातील पारावर विठ्ठल विठ्ठल जप करणारा जुगारी, कणकवलीतील टिंगेल कोंतरे, बांदा येथील आबलो, खानाचा जब्बर, सावंतवाडीचा विशाल हृदयाचा जुगारी, कुडाळातील आनंदात फळे विकणारा, तळेरेचा हॉटेलवाला, मसुर्याचा शहद म्हणजे मध मालवण, वेंगुर्ला येथील कित्येक अट्टल जुगारी पुन्हा एकदा नवा फड उभारून खारेपाटण येथील गोडबन असलेल्या हॉटेलात खाकीच्या आशिर्वादाने जुगाराची मैफल उधळीत आहेत.
जिल्ह्यात मटका, दारूवर कारवाई सुरू झालेलीच होती परंतु जिल्हा पोलिस अधिक्षकांची बदली होताच कारवाई थांबली आणि पुन्हा एकदा गैरधंदे जोरदार सुरू झाले आहेत. नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे जिल्ह्यातील जुगार, मटका, ड्रग्स आणि दारूच्या गैरधंद्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा