You are currently viewing दिल्लीत जाऊन फक्त निवेदने फिरवत राहू नका,शासकीय मेडिकल कॉलेजच्या मान्यतेसाठी आमची मदत घ्या…

दिल्लीत जाऊन फक्त निवेदने फिरवत राहू नका,शासकीय मेडिकल कॉलेजच्या मान्यतेसाठी आमची मदत घ्या…

आम.नितेश राणे यांचे आवाहन, खासदार विनायक राऊत यांना दिला टोला

शासकीय मेडिकल कॉलेज हे जनतेचे, स्वतःच्या मालकीचे असल्या सारखे वागू नका

कणकवली

शासकीय मेडिकलच्या नावाने गवगवा करताना केंद्र शासनाने परवानगी नाकारली तर मात्र राणे साहेब केंद्रात मंत्री असल्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज ला परवानगी नाकारल्याचा कांगावा शिवसनेनेचे नेते करत आहेत. केंद्राच्या समितीने परवानगी नाकारताना अधिकृत प्रोफेसर वर्गातील स्टाफ न भरल्याचे कारण नमूद केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोफेसर डेप्युटेशन वर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखविण्यात आले आहेत. मेडिकल कॉलेजच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय कमिटीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करावी.त्यासाठी आमच्या अनुभवाची मदत देऊ शकतो.हे कॉलेज सर्व जनतेचे आहे.त्यामुळे केवळ निवेदने फिरवत राहू नका.दिल्लीत तुमची काय अवस्था झालेली असते ती सर्वानाच माहीत आहे अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकात परिषदेत केली.

ते म्हणाले, शासकीय मेडिकल कॉलेज हे जनतेचे आहे. स्वतःच्या मालकीचे असल्यासारखे वागण्यापेक्षा हे गव्हरमेंट मेडिकल कॉलेज आहे याचे भान ठेवा आणि त्रुटींची पूर्तता करा. शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच फायदा होणार आहे. शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती आम्ही देण्यास तयार आहोत. आमच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्यासोबत जॉईंट मिटिंग घ्यावी. जेणेकरून शासकीय मेडिकल कॉलेज लवकर सुरू होईल. खासदार विनायक राऊत हे दिल्लीत केवळ निवेदनाचे फोटो मीडियाला देण्याशिवाय आणखी काही करू शकत नाहीत अशी टीकाही आमदार नितेश राणेंनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा