You are currently viewing महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थीनी पियुषा वारंगची तलाठी भरतीत निवड

महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थीनी पियुषा वारंगची तलाठी भरतीत निवड

सावंतवाडी :

 

सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थीनी पियुषा पुरूषोत्तम वारंग हीची नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीत रायगड जिल्ह्यामध्ये निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख महेंद्र पेडणेकर यांनी तिचे विशेष कौतूक केले आहे.

सावंतवाडीतील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पियुषा वारंग हिने यासाठी खडतर व प्रामाणिक प्रयत्न केले. त्यात तिची या निवड प्रक्रियेत निवड झाली. त्यामुळे आता अन्य विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे आवाहन श्री. पेडणेकर यांनी केले.

पियुषा ही सावंतवाडीची रहिवासी असून राणी पार्वती देवी हायस्कुल आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालयात तिचे शिक्षण झाले. नुकत्याच झालेल्या तलाठी परिक्षेसाठी ती प्रविष्ठ झाली होती. यासाठी महेंद्र अकॅडमी मधून तिला मार्गदर्शन मिळाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =