You are currently viewing कोरोना काळात केलेल्या कोट्यावधीच्या खरेदीची “श्वेत पत्रिका”काढा – आम.नितेश राणे

कोरोना काळात केलेल्या कोट्यावधीच्या खरेदीची “श्वेत पत्रिका”काढा – आम.नितेश राणे

जिल्ह्यात २ हजार आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट ३ नोव्हेंबरपासून पेंडिंग

सरकारच्या गलथान कारभाराचा आम.नितेश राणे यांनी केला भांडा फोड

कणकवली

कोरोना काळात रेड झोन मध्ये असलेला सिंधुदुर्ग हळूहळू पूर्वपदावर येत आहे.मात्र ३ नोव्हेंबर पासून आजपर्यंत २ हजार आरटीपीसीआर टेस्ट चे शाम्पल चे पडून आहेत. त्याचे रिपोर्ट अद्याप मिळाले नसल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी जी खरेदी झाली त्याचे ऑडिट झाले पाहिजे. आज अहमदनगर मध्ये रुग्णालयाला आग लागली अशा घटना भविष्यात जिल्हा रुग्णालयात होऊ शाकतात कारण जी खरेदी कोरोना काळात झाली त्यावरच प्रश्नचिन्ह आहे. १६ कोटी, २०कोटी, २२ कोटी अशी जी खरेदी झाली आहे. त्यातील बहुतेक गोष्टी फक्त कागदावरच आहेत त्या साधन सामुग्री प्रत्यक्षात नाहीत. कोरोना काळात जी काय खरेदी झाली आहे त्याची एक ” श्वेत पत्रिका” निघालीच पाहिजे. आणि त्याची सुरवात सिंधुदुर्ग जिल्हापासून करावी, पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतःहून ही श्वेत पत्रिका जाहीर करावी असे आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिले.

कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार नितेश राणे म्हणाले, कोरोना काळात आम्ही आमदारांचा निधी आरोग्यासाठी दिला आहे. तो निधी आणि शासनाने दिलेला निधी यांचे खरेदी केलेल्या वस्तू आणि यंत्र सामुग्री दाखवा मात्र हे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांरी असा पारदर्शक कारभार दाखवू शकणार नाहीत.जसे वानखेडे च्या कपडे, बूट आणि घड्याळा वर बोलता तसे खूप लोकांचे कपडे आणि गाड्या या जिल्हा रुग्णालयात तयार झालेल्या आहेत अशी घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट मिळालेले नाहीत.
सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार सुरू आहे. सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत. प्रशासनाकडून दररोज कोरोना टेस्ट चा दिला जाणारा आकडा बोगस आहे. २ हजार टेस्ट चे रिपोर्ट मिळाले नसले तरी शाम्पल घेतलेले २ हजार नागरिक समाजात फिरत आहेत. यातील ज्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येतील आणि त्याचा संसर्ग इतरांना झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला.कुठलीही लपवाछपवी न करता या 2 हजार टेस्ट रिपोर्ट बाबत सत्य माहिती प्रशासनाने जनतेसमोर ठेवावी अशी मागणीही आमदार नितेश यांनी केली. 16 नोव्हेंबर च्या डीपीडिसी मिटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणार असल्याचे सांगत आमदार नितेश यांनी डिपीडिसी मिटिंग वादळी होणार असल्याचे संकेत दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − six =