You are currently viewing कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी किलबिल जल्लोष

कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी किलबिल जल्लोष

समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली

बालदिनाचे औचित्य साधत येत्या २० नोव्हेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे लहान मुलांसाठी एक दिवस किलबिल जल्लोष या खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच कणकवलीत आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता खाऊ गल्लीचे उदघाटन होणार आहे. पुणे येथील गायक सौरभ दफ्तरदार यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी, थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जादूगार सुचित्रा इंदुलकर यांचे जादूचे खेळ हे खास आकर्षण असणार आहे. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना सरप्राईज गिफ्ट मोफत देण्यात येणार आहे. यावेळी बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभि मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, चारू साटम, राजू गवाणकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =