You are currently viewing कोकिसरे रेल्वे फाटक नजीक रेल्वेच्या धडकेत बैल गतप्राण

कोकिसरे रेल्वे फाटक नजीक रेल्वेच्या धडकेत बैल गतप्राण

वैभववाडी
कोकिसरे रेल्वे फाटक नजीक ट्रेनची बैलाला जोरदार धडक बसली. या अपघातामुळे फाटकावर तब्बल एक तास ट्रेन थांबवण्यात आली. यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
मुंबई वरुन गोव्याकडे ट्रक वाहतूक करणारी ६५९८ डाउन ट्रेन वैभववाडी रेल्वे फाटक परिसरात आली असताना ट्रेन ची रुळावर आलेल्या बैलाला धडक बसली. या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू झाला. बैलाला रुळावरून बाजूला करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. त्यामुळे तासाहून अधिक काळ रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेर एक तासाने रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा