You are currently viewing सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिवाळी आंबोलीत शाळेत साजरी

सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिवाळी आंबोलीत शाळेत साजरी

संस्था अध्यक्ष पी,एफ,डाॅन्टस यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिवाळी आंबोलीत शाळेत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर बोलताना संस्थेचे अध्यक्ष पी एफ डाॅटस म्हणाले, आम्ही सैन्यात आर्मीमध्ये होतो त्या वेळी प्रत्येक क्षणामध्ये असे एकत्रित येऊन आनंद साजरा करायचो. आम्हाला दोन वर्षे घरी यायला मिळत नव्हते. आता तर कोरोनामुळे सर्व सण शाळेमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पालक आणि विद्यार्थ्यांची संमती दर्शवली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पी एफ डाॅटस म्हणाले, कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे अभ्यासक्रम देखील अपुरा राहिला आहे. दिवाळी सणात विद्यार्थ्यांना घरी पाठवले तर पुन्हा आरोग्य तपासणी करावी लागणार आणि ती एक विद्यार्थी व शाळेच्या दृष्टीने अडचण ठरेल म्हणून विद्यार्थी व पालकांच्या विचार घेऊन सर्व सण शाळेत साजरे करत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे ठरविले आहे.

सैन्यामध्ये जिंकण्यासाठी लढायचे असते हे आर्मी मध्ये आम्हाला शिकवले आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी काही शिस्तप्रिय उपक्रम हाती घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दिवाळी सणाच्या निमित्ताने किल्ले, आकाश कंदील, ग्रीटिंग कार्ड बनविणे, रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली. या मधून कौशल्य, कल्पकता दिसून आलेली आहे.विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल कायमच वाव देत आले आहे त्यामुळे या स्कूलचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो, असे श्री. पी एफ डाॅटस म्हणाले.

यावेळी प्रा.रुपेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. पाटील म्हणाले, “छत्रपती शिवरायांचे जीवन चारित्र्य आज आत्मसात करण्याची गरज आहे. आपण त्यांच्या विचारांवर चालण्यासाठी कटीबद्ध असायला हवं. केवळ बक्षिसे मिळविण्यासाठी किल्ले न बनविता त्यांच्या इतिहासाला अध्ययन करावे. तसेच बक्षिसाची हवा डोक्यात जावू देवू नका. ही एक प्रेरणा आहे. जीवनात अशी एक तरी कला जोपासा. आपला सिंधुदुर्ग गुणवंतांचा जिल्हा आहे ही ओळख कायम ठेवा.

यावेळी केंद्रप्रमुख रामा गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्कूलचे प्राचार्य सुरेश गावडे म्हणाले की, यावर्षी दिवाळीची सुट्टी रद्द करून चुकलेला अभ्यासक्रम आता घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची दिवाळी यावेळी शाळेतच सर्व विद्यार्थी साजरा करणार आहेत.

संस्था सचिव सुनील राऊळ यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधून दिसून आलेले आहे. विद्यार्थी आपल्या कौशल्य गुण असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थाध्यक्ष श्री.डान्टस, सचिव सुनील राऊळ, कार्यालय सचिव दीपक राऊळ, केंद्रप्रमुख रामा गावडे, प्राचार्य सुरेश गावडे, कमांडंट कर्नल सुनील सिन्हा, संचालक शिवाजी परब, उपप्राचार्य ऋषिकेश गावडे, शिवराज पवार, जॉनी डिसोझा, श्री,संजय शिंदे, आनंद कुडाळकर,अरुण गावडे, हंबिरराव अडकुरकर, बी.के.पाटकर, एस.एम जाधव, सतीश आईर, गावडे, पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. रुपेश पाटील, अनिल चव्हाण, विजय राऊत, महेश पेडणेकर, मायप्पा शिंदे तसेच सैनिक स्कूलचे सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एच.बी.अडकूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.एम. वाय.पेडणेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =