You are currently viewing शालेय विद्यार्थ्यांनी बनविला सोलर आकाश कंदील!

शालेय विद्यार्थ्यांनी बनविला सोलर आकाश कंदील!

मालवण

वडाचापाट येथील श्री शांतादुर्गा हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी शाळा बाह्य उपक्रम म्हणून सोलर आकाश कंदील बनविला आहे. प्रशालेच्या मुख्य गेट वर लावलेला हा कंदील सध्या दिवाळीच्या दिवसात विध्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करणारा ठरत आहे.

भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सदर सौर आकाश कंदील बनविला आहे. विजेची बचत, वाढती महागाई याचा विचार करून टाकाऊ तुन टिकाऊ असा कंदील विद्यार्थ्यांनी बनविल्याचे मुलांचे मार्गदर्शक शिक्षक केशव उर्फ भाऊ भोगले यांनी सांगितले. सध्या शाळा बंद असल्याने कंदील चालू – बंद करण्यासाठी ऑटोमॅटिक सर्किट जोडले असून त्यामुळे हा कंदील संध्याकाळी सुरू होतो तर सकाळ झाल्यावर आटोमॅटिक बंद होतो.

प्रशालेचे मुख्याध्यापक जे . एन . पाटील, समन्वयक पी. एच .कुबल, एमएसएफसी ऊर्जा पर्यावरण निदेशक आणि प्रकल्प मार्गदर्शक केशव भोगले आणि दहावी तील विद्यार्थी तन्वी जाधव ,लीलाक्षी कोचरेकर ,मीनाक्षी घाडीगावर , सिद्धेश घाडीगावकर, सुशील कासले ,सिद्धेश माळकर यांनी सहभाग घेतला.मुख्याध्यापक जे एन पाटील यांनी सर्व विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा