सिंधुदुर्गनगरी
आझादी का अमृत महोत्सव व विधी सेवा सप्ताह दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 च्या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरणतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये पुढील स्पर्धांचा समावेश आहे. चित्रकला स्पर्धा, इयत्ता- 5 ते 8 वी वयोगट – 11 ते 15 वर्षे विषय- कोरोना / बालमजूरी /शिक्षणाचा अधिकार. निबंध स्पर्धा इयत्ता- 8 ते 10 वी वयोगट – 12 ते 16 वर्षे विषय- भारतीय राज्यघटना. घोषवाक्य लेखन स्पर्धा इयत्ता- 9 ते 12 वी वयोगट – 14 ते 18 वर्षे विषय- कोरोना / बालमजूरी /शिक्षणाचा अधिकार/बेटी बचाओ बेटी पढाओ. लघुपट स्पर्धा (Short duration films on awareness) इयत्ता- 9 ते 12 वी वयोगट – 15 ते 18 वर्षे विषय- लोकन्यायालय/मध्यस्थी.
या स्पर्धा दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी सुरु होवून दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी समाप्त होतील. तरी ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्यांची चित्रे, निबंध, घोषवाक्ये, लघु चित्रपट हे दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ते 11 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये secretarydlsasin289@gmail.com या ई-मेल वर पाठवावीत किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व्दारा जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग-ओरोस यांचे कार्यालयात दिनांक 11 नोव्हेंबर 2021 पूर्वी पोहोचतील अशी पाठवावी, असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.